सोमवार, 20 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 20 जानेवारी 2025 (16:21 IST)

कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा

jail
कोलकाता बलात्कार-हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयला आज शिक्षा सुनावण्यात आली आहे.न्यायालयाने त्याला 18 जानेवारी रोजी दोषी घोषित केले होते

सियालदह न्यायालयात त्याला 9 ऑगस्ट 2024 रोजी आरजी कार मेडिकल कॉलेज मधील एका महिला डॉक्टरवर बलात्कार आणि तिची हत्या केल्या प्रकरणी आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 
संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने 18 जानेवारी रोजी महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.बीएनएसच्या कलम 64, 66 आणि 103(1) अंतर्गत संजय रॉय यांना दोषी ठरवण्यात आले.

काय आहे प्रकरण 
9 ऑगस्ट 2024 रोजी रुग्णालयाच्या कॉन्फरन्स रुम मध्ये महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळला होता. शवविच्छेदनाच्या अहवालात डॉक्टरवर आधी बलात्कार आणि नंतर खून केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेच्या विरोधात डॉक्टरांनी बराच काळ आंदोलन केले होते.

या प्रकरणाची सुनावणी 12 नोव्हेंबरपासून बंद खोलीत सुरू झाली. एकूण 50 साक्षीदार तपासण्यात आले आणि 9 जानेवारी रोजी सुनावणी पूर्ण झाली. या प्रकरणातील मुख्य आरोपी संजय रॉय होता. 9 ऑगस्टला घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी 10 ऑगस्टला संजय रॉयला अटक केली होती. पीडितेच्या शरीराजवळ सापडलेल्या ब्लूटूथ इअरफोनमुळे पोलिसांनी संजय रॉयला अटक केली.हे प्रकरण देशभरात खूप गाजले.

न्यायालयाने 18 जानेवारी रोजी संजय रॉयला दोषी ठरवले तेव्हा संजय रॉय यांनी आपण निर्दोष असल्याचे सांगितले.पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या संजय रॉय यांनी सांगितले की, डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात त्यांना खोटे गोवण्यात आले आहे. ज्या रुग्णालयाच्या सेमिनार हॉलजवळ डॉक्टरची हत्या करण्यात आली होती त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संजय रॉय फिरताना दिसत होते. या वरुन संजय रॉय दोषी आढळले . आता आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
Edited By - Priya Dixit