शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: पाटणा , शनिवार, 20 मे 2017 (12:43 IST)

लालू प्रसाद यादव यांचा टोमणा भाजपचे तारुण्य आता संपले

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर टोमणा मारला आहे की भाजपचे तारुण्य संपले आहे, त्यामुळे एनडीएचे हे सरकार पाच वर्षाचा कार्यकाळही पूर्ण करु शकणार नाही.  
 
बेहिशेबी संपत्ती प्रकरणी आयकर विभागाने नुकतेच लालू प्रसाद यादव यांच्या 22 ठिकाणांवर छापे मारले होते. यानंतर आज पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. गेलेले तारुण्य कधीही परत येत नाही, मग तुम्ही कितीही तूप-रोटी खा किंवा दुसरे काही खा, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमुळे लालू प्रसाद यादव चांगलेच भडकले आहेत. त्यामुळे त्यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. ज्यांनी अब्जावधी रुपये लुटले ते आता आमच्यावर आरोप लावत आहेत. असे म्हणत लालू प्रसाद यांनी भाजपवर निशाणा साधला. भाजपला दिल्लीतून हटवेन तेव्हाच मी शांत बसेन. असेही यावेळी लालू प्रसाद म्हणाले. एनडीए सरकारने तीन वर्षात एवढे गुन्हे केले आहेत की, ते आता पाच वर्षही पूर्ण करु शकणार नाहीत. 27 ऑगस्टला समान विचारधारा असणारे पक्ष एक रॅली काढणार आहेत. असेही लालूंनी यावेळी सांगितले.