सोमवार, 3 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016 (17:07 IST)

लोकसभेत एकाचा प्रेक्षक गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न

लोकसभेमध्ये एकाने प्रेक्षक गॅलरीतून दालनात उडी मारण्याचा प्रयत्न केला आहे. राकेशसिंह बघैल असे त्या व्यक्तीचे नाव असून तो  उत्तरप्रदेशचा रहिवाशी आहे. तो लोकसभेत कामकाज पाहायलाआला होता. काही वेळाने राकेशसिंहने नोटाबंदीविरोधात घोषणबाजी केली. सर्वसामान्यांना घर घेण्याचा अधिकार नाही का, असे ओरडत गोंधळ  घातला. त्याचवेळी  त्याने सभागृहाच्या दालनात उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी त्याला तातडीने रोखले.