मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनौ , शनिवार, 21 ऑगस्ट 2021 (21:55 IST)

BJPचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. सांगायचे म्हणजे की कल्याण सिंह यांची तब्येत जवळजवळ दोन महिन्यांपासून बिघडत होती. त्यांना एसजीपीजीआय, लखनऊ येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर ठेवण्यात आले. ते 89 वर्षांचे होते. भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांच्या निधनानंतर सीएम योगींनी त्यांचा गोरखपूर दौरा रद्द केला. यूपीचे मुख्यमंत्री असण्याव्यतिरिक्त कल्याण सिंह राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राहिले आहेत. मृत्यूची माहिती मिळताच भाजपचे मंत्री, खासदार आणि अनेक कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
 
PGI ने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, माननीय कल्याण सिंह, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. त्यांना 4 जुलै रोजी संजय गांधी पीजीआयच्या Critical Care medicine च्या आयसीयूमध्ये गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते. प्रदीर्घ आजार आणि शरीराच्या अनेक अवयवांना हळूहळू अपयश आल्याने त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.