शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 मार्च 2017 (12:06 IST)

पंख्याला लटकलेले मिळाले JNU विद्यार्थीचे शव

रोहित वेमुलाच्या मृत्यूला अद्याप एक वर्ष देखील पूर्ण झाले नाही की होळीच्या संध्याकाळी जेएनयूच्या एक अजून दलित विद्यार्थीच्या आत्महत्येचे प्रकरण गरम होत दिसू लागले आहे. तुम्हाला सांगायचे म्हणजे तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यात राहणारा  मुथुकृष्णनन जीवानंदमचा शव एका मित्राच्या घरात पंख्यावर लटकलेले दिसले. 25 वर्षीय मथुकृष्णन जेएनयूमध्ये एम. फिलचा विद्यार्थी होता. त्याने आपल्या शेवटच्या फेसबुक पोस्टामध्ये असमानतेची गोष्ट केली होती.  
 
10 मार्च रोजी लिहिण्यात आलेल्या पोस्टामध्ये त्याने लिहिले आहे, "एमफिल/पीएचडी प्रवेशमध्ये कुठलीही समानता नाही आहे.  वायवामध्ये देखील समानता नाही आहे. येथे केवस समानतेचे खंडन करण्यात आले आहे. प्रोफेसर सुखदेव थोरट यांच्या सिफारिशला नकार देतात, एड ब्लॉकमध्ये विद्यार्थ्यांचा विरोध नाकारतात, मार्जिनालाच शिक्षेला नाकारतात. जेव्हा समानतेला नकार देण्यात येतो तेव्हा सर्वकाही वंचित होऊन जात."
 
कुटुंबीयांनी सलेममध्ये केला विरोध प्रदर्शन 
सलेममध्ये रजनी कृषच्या कुटुंबीयांच्या लोकांनी सोमवारी सायंकाळी विरोध प्रदर्शनात रस्त्यावर जाम करून आपला क्रोध प्रकट केला आहे. प्रदर्शनात मुथुकृष्णननच्या कुटुंबातील लोक, डीवाईएफआईचे सदस्य आणि विदुथलाई सरुथईचे सदस्य होते. परिवारच्या लोकांचे म्हणणे आहे की मुथुकृष्णननचा मृत्यू रहस्यमय परिस्थितीत झाला आहे. त्यांनी दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूची निंदा केली आणि नुकसान भरपाईची देखील मागणी केली. अशी उमेद करण्यात येत आहे की मुथुकृष्णनन यांचा परिवार मंगळवारी दिल्ली पोहचू शकतो. त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे की त्यांचा मुलगा एवढाही भित्रा नव्हता की तो आत्महत्या करून घेईल.  
 
रजनी कृषच्या नावाने ओळखला जात होता मथुकृष्णनन 
सांगायचे म्हणजे की मुथुकृष्णनन हैदराबाद विश्वविद्यालयामध्ये रोहित वेमुलासाला न्याय मिळावा त्यासाठी चालत असलेल्या आंदोलनाचा सक्रिय सदस्य होता. त्याला लोक त्याचे अभिनय आणि कथेमुळे ओळखत होते. मुथुकृष्णनन जीवानंदमने फेसबुकवर रजनी कृषच्या नावाने आपली प्रोफाइल तयार केली होती. ज्यावर तो एका दलित विद्यार्थीवर कथा लिहीत होता.  
 
मुथुकृष्णनन उर्फ रजनी कृषने कोयबंटूरहून बीएडचा अभ्यास केला होता ज्यानंतर हैदराबाद केंद्रीय विश्वविद्यालयामधून एम. ए. एमफिल.चा अभ्यास पूर्ण केला. या अगोदर त्याने रोहित वेमुला आणि त्याची आई राधिका वेमुलाच्या संघर्षावर एक ब्लाक  लिहिला आहे.  
 
नाही मिळाला सुसाइड नोट 
दिल्ली पोलिसानुसार सोमवारी सायंकाळी पाच वाजता पीसीआर कॉल आला होता. कॉलमध्ये म्हटले होते की एका विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत बंद केले आहे. ज्यानंतर पोलिस टीम मुनिरिका विहारच्या एका घरात पोहोचली. तेथे गेल्यावर पोलिसाला एक खोली आतून बंद मिळाली. पोलिसाने जेव्हा दार तोडून आत प्रवेश केला तर शव पंख्याला लटकलेले दिसले. क्राईम टीमने घटनास्थळावर जाऊन ती जागा बघितली आणि त्याची फोटोग्राफी देखील केली.  
 
पोलिसांप्रमाणे मुथुकृष्णनन होळीच्या दिवशी आपल्या मित्राच्या घरी जेवायला गेला होता. तेथे त्याने झोपायचे म्हणून दार आतून बंद केले. नंतर जेव्हा त्याच्या मित्रांनी दार खटखटकले तर आतून कुठलेही उत्तर मिळाले नाही तेव्हा पोलिसांना सांगण्यात आले. पोलिस याला आत्महत्येचा केस मानत आहे पण हे ही सांगत आहे की तेथून कुठलेही सुसाइड नोट मिळालेले नाही आहे.  
 
पोलिसांचे म्हणणे आहे की सध्या असे कुठलेही प्रकरण समोर आलेले नाही ज्यामुळे याला विश्वविद्यालयाशी जोडण्यात येईल. तो मागील काही दिवसांपासून वैयक्तिक बाबींमुळे परेशान होता.