मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 सप्टेंबर 2022 (23:29 IST)

गाडीच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांना सीटबेल्ट बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

nitin gadkari
कारमधील प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे.केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले की, वाहनाच्या मागच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर सरकारने कारच्या मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्ट घालणे बंधनकारक असेल."मंगळवारी नितीन गडकरी म्हणाले, "सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर, आज सरकारने मागच्या सीटवरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मागच्या सीटसाठीही सीट बेल्ट आवश्यक आहेत.
 
एका मीडिया इव्हेंटला संबोधित करताना, गडकरी म्हणाले, "सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर, आम्ही ठरवले आहे की वाहनांमध्ये मागील सीटसाठी सीटबेल्ट बीप सिस्टम देखील असेल," गडकरी म्हणाले.
 
टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर तज्ज्ञांनी वाहतूक आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील त्रुटींकडे लक्ष वेधले.कारमध्ये बसलेल्या लोकांना सीटबेल्ट लावणे आवश्यक आहे की नाही यावर नितीन गडकरी म्हणाले की, सर्व सीटबेल्ट घालणे बंधनकारक असेल.
 
या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.नितीन गडकरी म्हणाले, "सीट बेल्ट न घातल्यास चालान ची परवानगी दिली जाईल. या आदेशाची 3 दिवसांत अंमलबजावणी केली जाईल."