गुरूवार, 3 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : गुरूवार, 22 ऑगस्ट 2024 (11:51 IST)

विडी ओढण्याचा छंद पडला महागात, आंध्रप्रदेश मध्ये अनेक दुकाने व वाहनांना आग

fire
आंध्र प्रदेश मधील अनंतपुर जिल्ह्यातील कल्याणदुर्गम कसबा मध्ये एक मोठा अपघात होता होता राहिला. मिळालेल्या माहितीनुसार एक व्यक्ति ने बस स्टँडजवळ डब्ब्यात पाच लीटर पेट्रोल विकत घेतले. पण दुचाकीवर बसतांना डब्बा लीक झाला. व रस्त्यावर पेट्रोल पसरले. या संकटाशी अज्ञात असलेल्या एका व्यक्तीने विडी पेटवली. व काडेपेटीची काडी रस्त्यावर टाकली. 
 
यामुळे भीषण आग भडकली. रस्तावर पसरलेल्या पेट्रोलने पेट घेतला. ज्यामुळे रस्त्याच्या किनार्याला असलेले दुकाने व उभ्या दुचाकी आगीच्या विळख्यात सापडल्या. या घटनेचे गांभीर्य पाहता उपस्थित नागरिकांनी पाण्याच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे अधिक नुकसान होण्यापासून वाचले.  
 
नागरिकांनी या घटनेची सूचना पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. पोलिसांनी केस नोंदवून घेत तपास सुरु केला आहे.  

Edited By- Dhanashri Naik