शुक्रवार, 30 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 19 जुलै 2017 (11:28 IST)

नाराज मायावतींचा राज्यसभेचा राजीनामा

Mayawati resigns from Rajya Sabha

सहारनपूर हिंसेबाबत सभागृहात बोलण्यास संधी न दिल्याने बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला आहे. सहारनपूर हिंसेबाबत बोलण्यास संधी न दिल्यास राजीनाम्याची मायावतींनी धमकी दिली होती. त्यानंतर त्यांनी अखेर सभापतींकडे राजीनामा सुपूर्द केला. पुढील वर्षी एप्रिलमध्ये मायावती यांच्या राज्यसभा खासदारकीचा कार्यकाळ संपणार होता.

मी ज्या समाजातून येते, त्यांचेच मुद्दे मला सभागृहात मांडता येत नसतील, तर काय उपयोग?, असे मायावती यांनी राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हटले.