शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2017 (11:03 IST)

मायावती यांचा राजीनामा मंजूर

Mayawati

दलितांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी तडकाफडकी राजीनामा देणा-या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि खासदार मायावती यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. राज्यसभा सभापतींकडे त्यांना योग्य फॉर्मॅटमध्ये म्हणजे केवळ एका ओळीचा राजीनामा पुन्हा द्यावा लागला. त्यानंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. यापुर्वी मायावतींनी पाठवलेला राजीनामा तीन पानांचा होता पण तो योग्य स्वरूपात नसल्याने स्वीकारला जाणार नाही असं कारण देण्यात आलं होतं. मायावतींचा राज्यसभेतील कार्यकाळ पुढील वर्षी एप्रिल महिन्यात संपणार होता.