घटना घडली तेव्हा अर्पिताने ती पर्स पायाजवळ ठेवली होती. यावेळी अचानक मोबाईलचा स्फोट झाला आणि त्याने पेट घेतला. ज्यावेळी हा स्फोट झाला तेव्हा विमान हजारो फूट उंचीवर उडत होते. यादरम्यान, विमानातील निष्काळजीपणाही समोर आला. जेव्हा मोबाईलने पेट घेतला तेव्हा विमानात आग विझवण्याचे यंत्र कामच करत नव्हते. त्यामुळे पाण्याने आग विझवावी लागली.