गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 ऑक्टोबर 2017 (09:58 IST)

जवानांनी साजरी केली दिवाळी

जम्मू-काश्‍मीरमधील पुंछ येथे डोळ्यात तेल घालून देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांनीही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने  दिवाळी साजरी केली आहे. परंतु यावेळीही ते आपल्या कर्तव्याला विसरलेली नाहीत. ‘भारत माता की’, असा जयघोष करत जवानांनी ठेका धरला. यात चिमुकल्यांनी सहभागी होऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. छत्तीसगढमध्येही लष्कराच्या जवांनाना मिठाई देऊन येथील महिलांनीही त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. तसेच जवानांनीही एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.