रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 5 डिसेंबर 2022 (16:54 IST)

मुलीच्या लग्नाच्या 10 दिवस आधी आई प्रियकरासह फरार

हरिद्वार जिल्ह्यातील मंगलोर कोतवाली परिसरात एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नाच्या 10 दिवस आधी एक आई तिच्या प्रियकरासह पळून गेली. एवढेच नाही तर प्रियकरासह पळून जाण्यापूर्वी महिलेने तिच्या मुलीच्या लग्नासाठी तयार केलेले दागिनेही पळवून नेले. नातेवाइकांनी पोलीस ठाणे गाठले असता हा प्रकार उघडकीस आला. 
 
मंगळूर कोतवाली भागातील एक 38 वर्षीय महिला तिच्या मुलीच्या लग्नाच्या तयारीदरम्यान आपल्या प्रियकरा सोबत पळून गेली. यासोबतच लग्नासाठी घरात ठेवलेले लाखो रुपयांचे दागिनेही त्यांनी पळवून नेले. एका कंपनीत सदर महिला आणि तरुण एकत्र काम करायचे. 
 
महिलेच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाल्याची माहिती मिळाली. महिलेला 3 मुले (एक मुलगा आणि 3 मुली) आहेत. 14 डिसेंबरला मोठ्या मुलीचे लग्न होणार असताना,  घरात लग्नाची तयारी जोरात सुरू होती, पाहुण्यांचे आगमनही सुरू झाले होते. बहुतेक नातेवाईकांना लग्नाची निमंत्रणेही पाठवण्यात आली आहेत. शनिवारी रात्री कुटुंबाला सोडून ही महिला अचानक संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाली. 
 
संशयाच्या आधारे त्या तरुणाची (महिलेचा प्रियकर) माहिती गोळा केली असता तोही घरातून फरार असल्याचे निष्पन्न झाले. घराची झडती घेतली असता लाखो रुपयांचे दागिनेही गायब आढळून आले. हे प्रकरण रविवारी पोलिसांपर्यंत पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.  
 
महिला आणि तरुण दोघेही कारखान्यात एकत्र काम करत असल्याने दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. दोघांचा शोध सुरू करण्यात आला असून लवकरच दोघांनाही ताब्यात घेण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. 
 
Edited By - Priya Dixit