मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 14 डिसेंबर 2022 (15:46 IST)

लेकीने लावले आईचे दुसरे लग्न

marriage
एका आई-मुलीची गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक, पतीच्या निधनानंतर एक महिला बराच काळ एकटी राहत होती. पण तिच्या मुलीने महिलेला दुसऱ्या लग्नासाठी प्रवृत्त केले आणि आता वयाच्या 50 व्या वर्षी आईचे दुसरे लग्न करण्यात ती यशस्वी झाली. वृत्तानुसार मुलगी म्हणाली- आता माझी आई खूप आनंदी आहे आणि खूप एन्जॉय करते आहे.
 
ही कथा मूळ मेघालयची राजधानी शिलाँग येथील रहिवासी देबर्ती चक्रवर्ती आणि तिची आई मौसमी चक्रवर्ती यांची आहे. देबर्ती सांगते की तिचे वडील शिलाँगचे प्रसिद्ध डॉक्टर होते. लहान वयातच ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे अचानक निधन झाले. तेव्हा तिची आई 25 वर्षांची होती. आणि ती स्वतः 2 वर्षांची होती.
 
वडिलांच्या निधनानंतर देबर्ती आणि त्यांची आई शिलाँगमध्ये त्यांच्या आजीच्या घरी राहू लागले. तिची आई शिक्षिका होती. देबर्ती म्हणाली- मला नेहमी वाटायचे की तिनी   जोडीदार शोधावा. पण ती म्हणायची - माझं लग्न झालं तर तुझं काय होईल.

देबर्तीने सांगितले- वडिलांच्या निधनानंतर काकासोबत मालमत्तेवरून घरात वाद झाला. ते कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचले. या सगळ्या गोष्टींमध्ये तीही अडकली होती.

देबर्ती आता मुंबईत राहते. ती फ्रीलान्स टॅलेंट मॅनेजर म्हणून काम करते. आईच्या दुस-या लग्नाबद्दल सांगताना देवर्ती म्हणाली- लग्न साजरे करायला आईला खूप वेळ लागला. आधी मी तिला कोणाशी तरी मैत्री करायला सांगितले. सुरुवातीला मी एवढेच म्हणाले की निदान बोला. मित्र बनवा मग मी म्हणले कि आता लग्न कर.
 
या वर्षी मार्चमध्ये देबर्तीच्या आईचे पश्चिम बंगालमधील स्वपनसोबत लग्न झाले. दोघेही 50 वर्षांचे आहेत. स्वपनचे हे पहिले लग्न असल्याचे देबर्ती सांगतात. लग्नानंतर आईच्या आयुष्यात खूप बदल झाल्याचे त्यांनी सांगितले. ती आता खूप खुश आहे. पूर्वी ती प्रत्येक गोष्टीवर चिडायची. पण आता ती खूप काही करते.
Edited by : Smita Joshi