रविवार, 11 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: लखनौ , शनिवार, 12 ऑगस्ट 2017 (09:42 IST)

बिहारमधील जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांची आत्महत्या

mukesh pandey
बिहारमधील बक्‍सरचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी उत्तरप्रदेशात आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. गाझियाबाद रेल्वे स्थानकापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर रूळांवर त्यांचा मृतदेह गुरूवारी रात्री आढळला. घटनास्थळी त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीही आढळली.
 
पांडे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 2012 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. वैवाहिक जीवनातील निराशेपोटी त्यांनी जीवनयात्रा संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. त्यांना एक कन्याही असल्याचे समजते. पांडे यांचे कुटूंबीय गुवाहाटीमध्ये राहतात. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पांडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. पांडे हे सक्षम प्रशासक आणि संवेदनशील अधिकारी होते, असे ट्‌विट त्यांनी केले.