शुक्रवार, 6 मार्च 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 2 जानेवारी 2017 (17:01 IST)

सपाचे ५ जानेवारीला होणारे राष्ट्रीय अधिवेशन स्थगित

mulayam singh yadav
उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेली यादवी अजूनही थांबायला तयार नाही. आता मुलायमसिंह यादव यांनी समाजवादीचे ५ जानेवारी रोजी होणारे राष्ट्रीय अधिवेशन स्थगित केले आहे. यासंदर्भात त्यांचे बंधू शिवपाल यादव यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. तसेच पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांनी आपल्या क्षेत्रात निवडणुकीच्या तयारीला लागावे असा संदेशही त्यांनी दिला आहे. रामगोपाल यादव यांनी बोलावलेल्या पाटीच्या अधिवेशनात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्यात आले होते. त्यानंतर मुलायमसिंह यादव यांनी पक्षाचे अधिवेशन बोलविण्याचा निर्णय घेतला होता. या अधिवेशनादरम्यान काही मोठे निर्णय होण्याची शक्यता होती.