गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 जानेवारी 2017 (09:54 IST)

रामगोपाल यांना सप फोडायचा आहे: मुलायम

समाजवादी पक्षाचे ना निवडणूक चिन्ह पक्षाचे ना नाव बदलणार असल्याचे पक्षाचे सुप्रिमो मुलायमसिंह यादव यांनी आपल्या समर्थकांसमोर ठणकावून सांगितले. या वेळी त्यांनी प्रथम इशार्‍याने व नंतर थेट नाव घेत पक्षातील दुहीस रामगोपाल यादव यांनाच पुन्हा जबाबदार धरले.
 
रामगोपाल यांना वेगळा पक्ष काढायचा असून त्यांनी चार वेळा दुसर्‍या पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असल्याचा आरोप केला. या वेळी मुला‍य‍मसिंह यांच्याबरोबर शिवपाल यादव हेही होते.
 
ते म्हणाले, पक्ष उभा करण्यासाठी मी खूप त्रास सहन केलेला आहे, लाठ्या खाल्या. मोठ्या संघर्षानंतर सप बनला आहे. अखिलेश अडीच- तीन वर्षांचे असताना ती तुरूंगात गेलो होतो. कार्यकर्त्यांनी त्रास सहन केला आहे. पक्षाच्या एकतेसाठी वेळा दिला. त्यासाठी आवश्यक ते सर्व पाऊल उचलले.