गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (15:02 IST)

मुज्जफरनगर : दोन नवजात बालकांचा एसीच्या थंडीने गारठून मृत्यू

Born Child
उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगर येथे एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे उपचारासाठी दाखल असलेल्या दोन नवजात बाळांचा एसीच्या थंडीने गारठून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मुलांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. 

सदर घटना उत्तरप्रदेशातील मुजफ्फर नगरच्या बसेरा गावातील आहे. या गावातील एका दाम्पत्याच्या दोन नवजात बालकांना एका स्थानिक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांना फोटोथेरेपी युनिट मध्ये ठेवण्यात आले होते. रात्री या युनिटचे एसी चालू राहिल्यामुळे या बाळांचा थंडीने गारठून मृत्यू झाला. ही बाब त्यांच्या पालकांना समजल्यावर रुग्णालयात गोंधळ उडाला. 

मुलांची तपासणी केल्यावर त्यांना मृत घोषित केल्यामुळे आईने हंबरडा फोडला. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या प्रकरणातील दोषी असलेले डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात . या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपी डॉक्टरांवर अनावधानाने झालेल्या मृत्यू प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
 
   Edited by - Priya Dixit