रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2017 (20:23 IST)

पंतप्रधानांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडी आणि परळीतील 3 औष्णिक वीजप्रकल्पातील नवीन उर्जासंचांचं लोकार्पण केले आहे. पंतप्रधान नागपूर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात पंतप्रधानांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन केले आहे. यात आयआयटी, आयआयएमसारख्या शैक्षणिक संस्थांचेही भूमिपूजन केले आहे. तसेच म्हाडाच्या नव्या गृहनिर्माण योजनेचीही सुरुवात केली .दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर नागपुरात मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उभारले जाणार आहे. या हॉस्पिटलला मिहान परिसरात 150 एकर जागा मिळाली आहे. इथे ही 260 बेड्‌सचे अत्याधुनिक हॉस्पिटल बनणार आहे.