1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 9 जून 2024 (17:51 IST)

नरेंद्र मोदी शपथविधी : नवी दिल्लीत अडीच हजार पोलीस तैनात, काही रस्तेही केले बंद

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीआधी राजधानी दिल्लीत आणि विशेषतः राष्ट्रपती भवनाभोवती विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
 
यानिमित्त राजधानीत पाच स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून राष्ट्रपती भवनाच्या आजूबाजूच्या भागात निमलष्करी दलाच्या पाच तुकड्या, NSG कमांडो आणि स्नायफर तैनात करण्यात आले आहेत.
आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचाही वापर केला जात आहे.
 
दिल्ली पोलिसांनी PTI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीत सुमारे अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
 
दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी एक ट्रॅफिक ॲडव्हायझरी देखील जारी केली आहे.
"दिल्लीतील काही रस्त्यांवर दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहनांची वाहतूक बंद राहील. राष्ट्रपती भवनाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर सरकारी बसेसनाही परवानगी देण्यात आली नाही," असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.18व्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीने 293 जागा जिंकल्या आहेत.
 
नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा होत आहे.
 
या साठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरु झाली असून दिल्ली पोलिसांचे 1100 वाहतूक कर्मचारी तैनात केले आहे. ट्रॅफिक ऍडव्हायजरी जारी केली आहे. संध्याकाळी 6 वाजता शपथविधी सोहळा सुरु होणार आहे. या समारोहासाठी मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रपती भवन परिसराच्या रस्त्यावरील वाहतुकींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या साठी निमलष्करी दलाच्या 5 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहे. या शिवाय एनएसजी कमांडो, ड्रोन, स्नायपर्स राष्ट्रपती भवनाच्या संरक्षणासाठी लागले आहे. 
 
Edited by - Priya Dixit