1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. nashata in karnatak

बंगळुरूमध्ये सवलतीच्या दरात नाश्ता, जेवण देणारी नम्मा कँटिन

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात नाश्ता आणि जेवण मिळावे यासाठी कर्नाटक सरकारने पुढाकार घेतला आहे.  बंगळुरूमध्ये सवलतीच्या दरात नाश्ता जेवण देणारी नम्मा कँटिन सुरू करण्यासाठी कर्नाटक सरकारकडून 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या कँटिनमध्ये केवळ 5 रुपयात नाश्ता तर 10 रुपयात जेवण मिळणार आहे.  याआधी तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी अम्मा कँटिनच्या माध्यमातून स्वस्तान भोजन देण्याची योजना तामिळनाडूमध्ये यशस्वीपणे राबवली होती. त्याच प्रकारची योजना कर्नाटक सरकारने आखली आहे.  कर्नाटक सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. 
पुढील लेख
उत्पादनखर्चावर आधारित हमीभाव देणार नसाल तर कर्जमाफी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क- छगन भुजबळ