मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 जुलै 2020 (16:34 IST)

म्यानमार सीमेवर दहशतवादी हल्ला, ४ जवान शहीद

भारताच्या म्यानमारजवळील सीमेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात चार आसाम रायफलचे जवान शहीद झाले आहेत. तर या दहशतवादी हल्ल्यात इतर चार जवान जखमी झाले आहेत. हा हल्ला पिपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) केले आहे. 
 
म्यानमारजवळील सीमेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आसाम जवानांवर गोळीबार करण्यात आला. इंफाळपासून सुमारे १०० किमीच्या अंतरावर असलेल्या चंदेल जिल्ह्यात हा हल्ला करण्यात आला आहे. दरम्यान, भारतीय लष्कराकडून या भागात अतिरेक्यांना शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या बरोबरच भारत आणि म्यानमार सीमेवर देखील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.