बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 9 सप्टेंबर 2017 (12:25 IST)

नाशिकचेही गोरखपूर होणार का?

नाशिकचेही गोरखपूर होणार का? नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात १५० पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू

जबाबदारी स्वीकारत आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा – नवाब मलिक

ऑक्सिजनअभावी उत्तर प्रदेशमधील लहान बालकांच्या मृत्यूची घटना ताजी असताना महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात सुविधेअभावी आणि ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने तब्बल ५५ बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी या घटनेबाबत खंत व्यक्त केली आहे. तसेच आरोग्य मंत्री दीपक सावंत  यांनी झालेल्या प्रकाराची जबाबदारी स्वीकारत राजीनाम्या द्यावा अशी मागणीही केली आहे.
 

याबाबत सविस्तर बोलताना मलिक म्हणाले की ज्याप्रमाणे सुविधेअभावी आणि ऑक्सिजन नसल्याने उत्तर प्रदेशमध्ये अनेक लहान मुलांचे बळी गेले त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात नाशिक जिल्ह्यात तब्बल ५५ बालकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बाब अत्यंत आश्चर्यकारक असून महाराष्ट्रासारख्या राज्यात अशी घटना घडणे म्हणजे दुर्दैवी आहे. या घटनेची संपूर्ण जबाबदारी राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी स्वीकारावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी तसेच आरोग्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा असे ते म्हणाले. राज्यातील शासकीय रुग्णालयातील आरोग्य सेवेचा दर्जा वाढविण्यासाठी व तत्पर सेवा देण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असणे आवश्यक आहे.