बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 23 जून 2024 (16:02 IST)

NEET-UG Scam : नीट हेराफेरी प्रकरणात सीबीआय ने FIR नोंदवला

cbi6
पेपर लीक प्रकरणाने सध्या देशभरात चर्चा रंगल्या आहेत. आता बातमी अशी आहे की केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने NEET-UG मधील अनियमिततेबाबत FIR नोंदवली आहे. एजन्सीशी संबंधित अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून सीबीआयने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 5 मे रोजी झालेल्या अनेक NEET-UG परीक्षांमध्ये कथित अनियमितता आणि फसवणुकीची प्रकरणे समोर आली आहेत. ते पुढे म्हणाले की, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी हे प्रकरण तपासासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे
 
या प्रकरणात बिहार मधून काही लोकांना ताब्यात घेतले आहे. तसेच पेपर लीक  प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रात देखील सापडले आहे. या प्रकरणी लातूर मधून दोन शिक्षकांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी करत आहे.शिक्षकांना नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाने संशयाच्या आधारे पकडले. 
 
5 मे रोजी झालेल्या NEET UG परीक्षेत सुमारे 24 लाख विद्यार्थी बसले होते, परंतु 4 जून रोजी निकाल जाहीर होताच आणि 1500 हून अधिक विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आल्याचे उघडकीस येताच हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. यानंतर एनटीएने विद्यार्थ्यांना दिलेले ग्रेस गुण काढून या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. आज, 1500 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी NEET UG परीक्षा पुन्हा घेतली जात आहे. याशिवाय NEET च्या कथित पेपर लीक प्रकरणावरही सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे.
 
Edited by - Priya Dixit