देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण -पंत प्रधान मोदी
आज संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवला आहे.
भारताच्या स्वातंत्र्याचे 75 वे वर्षं साजरे करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च मध्ये गुजरातच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमातून 'आझादी का अमृत महोत्सव' सुरू केला होता, जो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाटवर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून सलग आठव्यांदा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करत म्हणाले ,आज देशात 21 व्या शतकातील गरजा पूर्ण करण्यासाठी नवीन 'राष्ट्रीय शिक्षण धोरण' देखील आहे. जेव्हा गरीबांची मुलगी, गरीब मुलगा मातृभाषेत शिक्षण घेतल्यानंतर व्यावसायिक होतो, तेव्हा त्यांच्या क्षमतेनुसार न्याय मिळेल. मी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण हे दारिद्र्याविरूद्धच्या लढाईचे साधन मानतो. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. यामध्ये खेळांना बहिर्गामीऐवजी मुख्य प्रवाहातील शिक्षणाचा भाग बनवण्यात आले आहे. जीवनात प्रगती करण्यासाठी खेळ हे देखील सर्वात प्रभावी माध्यम आहे.