शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

रामनाथ कोविंद देशाचे नवीन राष्ट्रपती

देशाचे 14 वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ घेतली. आज दुपारी 12 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी राष्ट्रपतिपदाची शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधिश न्या. जगदीश सिंग केहार यांनी कोविंद यांना  पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधी सोहळ्यात देशाचे जवळपास सर्वच दिग्गज नेते,राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. 

शपथ घेतील. शपथ घेण्यापूर्वी ते महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी राजघाटला जाणार आहे.  
 

राष्ट्रपती व नव-नियुक्त राष्ट्रपती मान्यवरांसोबत एकत्र केंद्रीय कक्षात दाखल होतील. नव-नियुक्त राष्ट्रपतींनी भारताच्या मुख्य न्यायाधीशांकडून शपथ घेतल्यानंतर त्यांना तोफांची सलामी देण्यात येईल. त्यानंतर नवे महामहिम राष्ट्रपती भाषण करतील. तसेच सेवानिवृत्त होत असलेल्या राष्ट्रपतींना भावपूर्ण निरोप दिला जाईल.
 
गृह मंत्रालयाकडून प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार या समारंभात राज्यसभेचे सभापती, पंतप्रधान, भारताचे मुख्य न्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष, मंत्रिमंडळातील सदस्य, अनेक राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री, राजकीय पक्षाचे मुख्य नेते, खासदार, लष्करप्रमुख, नौसेनाप्रमुख, हवाईदलप्रमुख त्याचबरोबर भारत सरकारचे प्रमुख अधिकारी या समारंभात उपस्थित राहणार आहेत.