शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2017 (15:56 IST)

‘नीट’च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, 2017 हाच विद्यार्थ्यांचा पहिला प्रयत्न असणार

‘नीट’ ही वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ‘नीट’ 2017 हाच विद्यार्थ्यांचा पहिला प्रयत्न असणार आहे. कारण मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या मध्यस्तीनंतर तीन वेळा परीक्षा देण्याच्या नियमात बदल करण्यात आला आहे.
 
मेडीकल काऊन्सिल ऑफ इंडियाकडून (एमसीआय) स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर सीबीएसईने हा निर्णय घेतला आहे. 31 जानेवारीला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार विद्यार्थ्यांना केवळ 3 वेळा ‘नीट’ची परीक्षा देता येणार आहे. मात्र त्यामध्ये एआयपीएमटी दिलेला प्रयत्नही ग्राह्य धरला जात होता. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी देशभर ठिकठिकाणी देशभर निदर्शनं सुरु केली होती.
 
2017 पूर्वी दिलेल्या एआयपीएमटी किंवा ‘नीट’च्या प्रयत्नांना यावेळी ग्राह्य धरलं जाणार नाही, असं एमसीआयने स्पष्ट केलं. त्यानंतर नीट 2017 हाच विद्यार्थ्यांचा पहिला प्रयत्न ग्राह्य धरला जाईल, अशी अधिसूचना सीबीएसईकडून जारी करण्यात आली. त्यामुळे 2017 च्या ‘नीट’सह विद्यार्थ्यांना आणखी दोन वेळा परीक्षा देता येईल. मात्र वयाच्या अटीमध्ये मात्र कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे 25 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावं लागणार आहे.