मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (08:09 IST)

निजामुद्दीन-मडगाव राजधानी एक्स्प्रेस सुरु

कोकण मार्गावर दर-सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस २६ सप्टेंबरपासून धावू लागली आहे. त्यानंतर आजपासून  निजामुद्दीन-मडगाव राजधानी एक्स्प्रेसही सुरु झाली आहे.
 
कोकण मार्गावर शनिवारपासून धावणारी राजधानी एक्स्प्रेस शुक्रवारी व शनिवारी निजामुद्दीन येथून सकाळी ११.३५  वाजता सुटून दुसऱया दिवशी दुपारी २.२० वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून रविवारी व सोमवारी सकाळी ११ वाजता सुटून दुसऱया दिवशी सायंकाळी ४.४५  वा. निजामुद्दीनला पोहोचेल. ही एक्स्प्रेस ३० ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार व १ नोव्हेंबरपासून राजधानी एक्स्प्रेस नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. शुक्रवार व शनिवारी सकाळी ११.३५ वाजता निजामुद्दीन येथून सुटून दुसऱया दिवशी १२.५०  वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासात मडगाव येथून सकाळी १० वाजता सुटून दुसऱया दिवशी १२.४०  वाजता निजामुद्दीनला पोहोचेल. २०  डब्यांची राजधानी एक्स्प्रेस कोटा, वडोदरा, सुरत, पनवेल, रत्नागिरी आदी स्थानकावर थांबणार आहे.