शनिवार, 24 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (13:59 IST)

नोटा बदलण्यासाठी ग्राहकांच्या बोटांवर शाई लावणार

bank note
बँकामध्ये नोटा बदलण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांच्या बोटांवर निवडणुकीत वापरतात तशी शाई लावली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थसचिव शशिकांत दास यांनी दिली आहे. सध्या काही लोक वारंवार पैसे काढण्यासाठी, नोटा बदलण्यासाठी बँकांच्या रांगांमध्ये येऊन उभे रहात आहेत. त्यामुळे बँकांबाहेर रांग वाढत असून मर्यादीत प्रमाणात लोकांना फायदा मिळत आहे.  यावर उपाय म्हणून असे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.