शनिवार, 16 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (14:44 IST)

विमानतळावर पकडल्या १ कोटी पेक्षा अधिक नोटा

जुन्या आणि नव्या नोटा बदलून घेणे आणि बेकायदेशीर बदलेल्या नोटा जप्तीचं सत्र सुरुच आहे. आयकर विभागाची पथकं देशभरात विविध ठिकाणी छापा टाकत आहे. चेन्नई एअरपोर्टवर 1.34 कोटी रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्व नोटा 2000 रुपयांच्या आहेत. त्यामुळे पुन्हा नवीन नोटा बाजारात कश्या आल्या याची तपासणी पोलीस करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 34 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. हा पैसा कोणाचा आहे आणि तो  कुठे घेऊन जात होते, याची चौकशी सुरु आहे.
 
तर एका दलालाल तब्बल 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणाऱ्या एका व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. पारसमल लोढा असं या व्यावसायिकाचं नाव असून तो मूळ कोलकात्याचा आहे.लोढानेच कर्नाटकातले उद्योगपती शेखर रेड्डी यांचे 120 कोटी, दिल्लीतला वकिल रोहित टंडन याचे 25 कोटी बदलून दिले.