शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (16:16 IST)

आता 18 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांनाही देशात मिळणार बूस्टर डोस

कोरोना महामारीविरुद्धच्या लढाईला बळ देण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही बूस्टर डोस दिला जाईल. बुस्टर डोस देण्याची ही मोहीम रविवारपासून सुरू होणार आहे. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही कोरोनापासून बचाव करण्यासाठी बूस्टर डोस मिळू शकणार आहे. 10 एप्रिलपासून खासगी लसीकरण केंद्रांना भेट देऊन त्यांना ही लस घेता येणार आहे.