1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र केल्याचा प्रकार, मुख्य आरोपीला अटक

arrest
Manipur: मणिपूर पोलिसांनी सेनापती जिल्ह्यातील गावात 4 मे रोजी जमावाकडून 2 आदिवासी महिलांची नग्न परेड करून विनयभंग केल्याच्या व्हिडिओतील मुख्य आरोपींपैकी एका आरोपीला गुरुवारी अटक करण्यात आली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
 
या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक पोलिस पथके तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की, यापैकी एकाला, जो घटनेचा कथित मुख्य सूत्रधार आहे, त्याला थौबल जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या 26 सेकंदाच्या व्हिडिओ क्लिपमध्ये आरोपी ठळकपणे दिसत आहेत.
 
पोलिसांनी बुधवारी एक निवेदन जारी केले की अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा थौबल जिल्ह्यातील नॉन्गपोक सेकमाई पोलिस ठाण्यात अज्ञात सशस्त्र गुन्हेगारांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. मणिपूरमध्ये 3 मे पासून इम्फाळ खोऱ्यात राहणारा बहुसंख्य मीतेई समुदाय आणि डोंगराळ भागात राहणारा आदिवासी कुकी समुदाय यांच्यात जातीय संघर्ष सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.