गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2016 (13:22 IST)

माजी न्यायमूर्ती पीडी मुळे यांचे निधन

इंदूर- माजी न्यायमूर्ती आणि मराठी समाजाचे अध्यक्ष पीडी मुळे यांचे गुरुवारी निधन झाले. अंतिम यात्रा शुक्रवारी दुपारी त्यांच्या निवासाहून रामबाग मुक्तिधाम जाईल.
 
न्यायमूर्ती मुळे कानूनविद असून समाजसेवा क्षेत्रातही सक्रिय होते. ते विभिन्न एनजीओशी जुळलेले होते. 14 ऑक्टोबर 1926 साली जन्मलेले मुळे गोविंदराम सेकसरिया इंस्टीट्‍यूट ऑफ मॅनेजमेंट ऍड रिसर्च, गोविंदराम सेकसरिया इंस्टीट्‍यूट ऑफ टेक्नॉलॉजी ऍड साइंस, इंदूर लॉ इंस्टीट्‍यूट, नाथ मंदिर ट्रस्ट, मराठी समाजासह विभिन्न संस्थांशी जुळलेले होते.
 
इंदूर शहरातील प्रतिष्ठीत लोकांनी आणि विविध संस्थांनी जस्टिस मुळे यांच्या निधनावर शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.