शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

अभिजित, सोनू नंतर आता परेश रावल सुद्धा

वाचालवीर होवून प्रसिद्धी मिळवणे आणि सामाजिक तेढ निर्माण करणे. या मुळे सोशल साईट असलेल्या ट्विटर ने गायक अभिजितचे अकाऊंट बंद केले. त्याच्या पाठोपाठ निषेद करत सोनू निगमने आपले खाते बंद केले. त्यात आता परेश रावलची भर पडली आहे.
 
भाजपा खासदार परेश रावल यांचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. ते अकाऊंट पाहू शकतात, मात्र ते काही ट्विट करु शकत नाहीत. लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांच्यासंबंधी ट्विट डिलीट केलं नाही तर त्यांचं अकाऊंट ब्लॉक करण्यात येईल अशी सूचना त्यांना ट्विटरकडून देण्यात आली. परेश रावल यांनी नकार दिल्यानंतर ट्विटरने ते ट्विट डिलीट करत अकाऊंट सस्पेंड केलं आहे. काश्मिर प्रश्नावर आक्रमक भूमिका परेश यांनी घेतली होती. तर अरुंधती रॉय यांच्या विरोधात जोरदार मत त्यांनी मांडले होते. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. याच विरोधात तक्रार गेल्यावर ही कारवाई केली आहे.