शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 एप्रिल 2017 (12:32 IST)

पतंजली ब्रॅण्डची हॉटेल उद्योगात एन्ट्री

patanjali's postik restaurant
योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली ब्रॅण्डने हॉटेल उद्योगातही एन्ट्री केली आहे. पतंजलीने चंदीगडच्या झीरकपूरमध्ये इंडियानो हॉटेलमध्ये ‘पौष्टिक’ नावाचं रेस्टॉरंट सुरु केलं आहे. इथल्या पदार्थांची चव घरच्या जेवणासारखी असेल, असा दावा करण्यात आला आहे. तसंच चव आणि ग्राहकांचं आरोग्य या दोन गोष्टींची खास काळजी इथे घेतली जात असल्याची माहिती व्यवस्थापकांनी दिली आहे. सध्या या रेस्टॉरंटचं औपचारिक उद्घाटन झालेलं नाही. यासाठी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या तारखेची प्रतीक्षा आहे.