सोमवार, 19 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016 (09:54 IST)

मुंबईत पेट्रोल पंप बंद !

petrol pump
मुंबईत आज 11 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून शनिवार पहाटे पाच वाजेपर्यंत सर्व पेट्रोलपंप बंद राहतील असा निर्णय मुंबई पेट्रोल डिझेल असोसिएशनने घेतला आहे.  
 
केंद्र सरकारने पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे  पेट्रोल पंप, सीएनजी पंप यासारख्या काही महत्त्वाच्या ठिकाणी 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यात येणार येतील असे इंधन कंपन्यांनी घेतला आहोत. मात्र आज पासून पाचशे आणि हजारच्या नोटा घेतल्या जाणार नाहीत.
 
त्यामुळे आपली फजिती  होवू नये आणि सुट्ट्या पैशांवरुन ग्राहकांसोबत भांडण होऊ नये या करीता मुंबई पेट्रोल डिझेल असोसिएशनने हा निर्णय घेतला आहे.