बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (16:01 IST)

औषध कंपनीतील बॉयलरचा स्फोट होऊन 4 ठार, डझनभर गंभीर जखमी

वडोदराच्या मकरपुरा औद्योगिक परिसरात शुक्रवारी एका औषध कंपनीच्या प्लांटमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन एक महिला आणि एका मुलासह किमान चार कामगार ठार झाले आणि डझनभराहून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये 65 वर्षीय पुरुष, एक अल्पवयीन मुलगी , 30 वर्षीय महिला आणि 4 वर्षांच्या मुलीचा समावेश आहे . 
पोलिसांनी सांगितले की, मकरपुरा जीआयडीसी येथील कॅन्टन लॅबोरेटरीज या औषध कंपनीच्या बॉयलरमध्ये आज सकाळी अचानक स्फोट होऊन आग लागली. स्फोट एवढा जोरदार होता की त्याच्या धडकेमुळे सुमारे अर्धा ते एक किलोमीटर परिसरात इमारतींच्या काचा फुटल्या. 
अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले . कामगारांनी बॉयलरजवळ राहण्यासाठी घर बांधले होते. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. जखमी आणि मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
मकरपुरा पोलिस स्टेशनचे प्रभारी म्हणाले, "या परिसरात  9:30 वाजता मोठा स्फोट झाला. 15 जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील 4 जणांना मृत घोषित करण्यात आले, तर इतरांवर उपचार सुरू आहेत. ते म्हणाले की, या घटनेत ठार झालेल्या व जखमींमध्ये येथे काम करणारे कर्मचारी आणि त्यावेळी तेथून जाणाऱ्या लोकांचा समावेश आहे. ते  म्हणाले की, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली असून तपास करत आहे.