शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 मे 2022 (12:54 IST)

प्रयागराज मध्ये गंगेच्या काठावर पुन्हा मृतदेहांचा ढिगारा

अलाहाबादमध्ये पुन्हा एकदा गंगा नदीच्या किनारी वाळूत मोठ्या प्रमाणात मृतदेह पुरण्यात आले आहेत. येथे मृतदेह दफन करण्याची परंपरा पूर्वीपासून आहे. मात्र राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण (एनजीटी) आणि जिल्हा प्रशासनाने गंगेच्या घाटांवर मृतदेह पुरण्यास बंदी घातली आहे. असे असतानाही परंपरेच्या नावाखाली ज्याप्रकारे मृतदेह दफन केले जातात ते अत्यंत चिंताजनक आहे. फाफामाऊ घाटाच्या ताज्या छायाचित्रांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या काळातील आठवण करून दिली आहे. फाफामऊ घाटात दररोज डझनभर मृतदेह वाळूत पुरले जात आहेत. त्यामुळे सर्वत्र फक्त थडग्याच दिसून येत आहे .
 
प्रत्यक्षात मान्सून येण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. अशा परिस्थितीत गंगा नदीच्या काठावर जे मृतदेह पुरले जात आहेत, तेही नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यास ते गंगेत मिसळून जाण्याचा धोका आहे. यामुळे वाळूत पुरलेले मृतदेह गंगेत तर वाहून जातातच, पण त्यामुळे नदीही प्रदूषित होते. मात्र जिल्हा प्रशासनापासून ते महापालिकेपर्यंत याकडे पाठ फिरवत आहेत.
 
 अंत्यसंस्कारासाठी फाफामऊ घाटावर पोहोचलेले लोक घाटाची अवस्था चिंताजनक असल्याचे सांगतात. याकडे प्रशासन आणि महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप लोक करत आहेत.