शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (12:40 IST)

भाजपा नेते पियुष गोयल यांनी सरकारतर्फे दिले आहेत प्रत्युत्तर

- नोटबंदीच्या निर्णयाला काँग्रेस सर्जिकल स्ट्राईक म्हणत असेल, तर आम्हाला आनंद आहे, भ्रष्टाचार, काळ्यापैशाविरोधात हा सर्जिकल स्ट्राईकच - पियुष गोयल
- इमानदारीने कमावलेल्या पैशांवर कोणतेही निर्बंध घातलेले नाहीयेत - पियुष गोयल
- ५ चोरांमुळे इतर ९५ सर्वसामान्य लोकांवा भरपाई करावी लागते. हे चित्र बदलण्यासाठीच नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला - पियुष गोयल
- रिझर्व्ह बँक बोर्डाच्या सूचनेनंतरच ५०० व १००० च्या नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला - पियुष गोयल
- बँकेत पैसे भरण्याचा गरिबांना त्रास होत नाहीये, मात्र काळा पैसेवाले, पैसे लपवणाऱ्यांचेच धाबे दणाणले आहे - पियुष गोयल
- दु:खी होण्यापेक्षा सर्व पक्षांनी पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे - पियुष गोयल
- भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला पायबंद घालण्याच्या मुद्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेने बहुमताने निवडून दिले होते - पियुष गोयल
- नोटबंदीचा हा मुद्दा अतिशय संवेदनशील असून पंतप्रधानांनी राज्यसभेत येऊन या चर्चेत सहभाग घ्यावा - मायावती, बसपा प्रमुख.
- देशात पहिल्यांदाच इमानदार लोकांचा सन्मान झाला आहे आणि बेईमान लोकांचे नुकसान - पियुष गोयल
- सामान्य जनतेने पंतप्रधानांच्या (नोटबंदीच्या) या निर्णयाचे स्वागत केले असून ते खुश आहेत - पियुष गोयल
- काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल सरकारतर्फे देत आहेत प्रत्युत्तर