शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 17 ऑक्टोबर 2024 (09:41 IST)

पीएम मोदी बनले भाजपचे पहिले सक्रिय सदस्य, पंतप्रधानांनी ही सदस्यत्व मोहिमेला केली सुरुवात

narendra modi
पंतप्रधान मोदींनी X वर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली असून ते म्हणाले की, सक्रीय सदस्यत्व अभियानातून सक्रिय कार्यकर्ते घडवण्याचा अनोखा उपक्रम! मला खूप अभिमान आहे की आज एक पक्ष कार्यकर्ता म्हणून मी भाजप इंडियाचा पहिला सक्रिय सदस्य झालो आणि या अभियानाची सुरुवात केली.
 
मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारतीय जनता पक्षाचे पहिले सक्रिय सदस्य बनले आणि त्यांनी पक्षाची सक्रिय सदस्यत्व मोहीमही सुरू केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि या अभियानाचे समन्वयक सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत त्यांनी सक्रिय सदस्यत्व घेतले.
 
तसेच पंतप्रधान म्हणाले की, मी देशभरातील कार्यकर्त्यांना आवाहन करतो की भाजपचे सक्रिय सदस्य व्हा आणि या अभियानाला बळ द्या. पक्ष दर सहा वर्षांनी भाजप सदस्यत्व मोहीम राबवते.

Edited By- Dhanashri Naik