गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 2 मे 2022 (17:22 IST)

PM Modi Europe Visit: ब्रॅंडनबर्ग गेटवर भारताची विविधता झळकली ,भगवा झेंडा फडकला

PM Modi Europe Visit: India's diversity flashed at Brandenburg Gate
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या तीन दिवसीय युरोप दौऱ्याचा एक भाग म्हणून जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहोचले आहेत. काही काळानंतर ते बर्लिनमध्ये भारत-जर्मनी IGC बैठकीत सहभागी होतील. त्यानंतर ते जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांची भेट घेणार आहेत. संध्याकाळी ते जर्मनीत परदेशी भारतीयांना संबोधित करतील. बर्लिनहून पंतप्रधान मोदी 3 मे रोजी डेन्मार्कची राजधानी कोपनहेगनला पोहोचतील. बर्लिनच्या ब्रॅंडनबर्ग गेटवर भारताचे रंग प्रदर्शित झाले.पंत प्रधान मोदी यांचे स्वागत करण्यासाठी बर्लिन मध्ये भगवा झेंडा फडकला.
पंतप्रधान मोदी भारतीय समुदायाच्या लोकांमध्ये पोहोचले तेव्हा भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देण्यात आल्या. लहान मुले असोत की महिला, सगळेच पंतप्रधान मोदींची झलक पाहण्यासाठी आतुर दिसत होते. यावेळी पंतप्रधान मोदींनीही सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.