गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 4 फेब्रुवारी 2023 (13:59 IST)

PM मोदी सर्वात लोकप्रिय नेते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवड झाली आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या यादीत PM मोदी 78 टक्के जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बिडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह 16 देशांच्या दिग्गज नेत्यांना मागे सोडले आहे. पंतप्रधान मोदींना जगभरातील प्रौढांमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळाले आहे. या यादीत मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांना 68 टक्के मान्यता मिळाली आहे. तिसर्‍या क्रमांकावर स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अॅलेन बेर्सेट आहेत, ज्यांना 62 टक्के मान्यता मिळाली आहे. सर्वेक्षणानुसार, 2021 नंतर पीएम मोदींची लोकप्रियता आणखी वाढली आहे.
 
या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना पहिल्या पाचमध्ये स्थान मिळालेले नाही. बिडेन या यादीत 40 टक्के मान्यता रेटिंगसह सातव्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, सुनकने 30 टक्के मान्यता रेटिंगसह या यादीत 13 वे स्थान मिळवले आहे.
 
या यादीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज 58 टक्के मान्यता रेटिंगसह चौथ्या आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा 50 टक्के रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत.