सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (19:16 IST)

पूजा खेडकरची IAS सेवा संपुष्टात,केंद्र सरकारची कारवाई

Puja Khedkar
अनेक दिवसांपासून वादात सापडलेल्या पूजा खेडकरच्या आयएएस सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर या तिच्या अपंगत्व आणि इतर गैरप्रकारांमुळे बराच काळ वादात होत्या. केंद्र सरकारने शुक्रवारी (6 सप्टेंबर, 2024) एक आदेश पारित करून त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) मुक्त केले. 

पूजा खेडकर 2023 मध्ये आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाली, तर त्यापूर्वी ती या परीक्षेत नऊ वेळा नापास झाली होती. अशा परिस्थितीत 2023 च्या परीक्षेला बसण्याचा अधिकार तिला नव्हता आणि तिने  ही परीक्षा बनावट पद्धतीने दिली. या आधारावर पूजा यांची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे.

आदेशात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पूजा मनोरमा दिलीप खेडकर, IAS प्रोबेशनर (MH:2023) यांना IAS (प्रोबेशनरी) नियम, 1954 च्या नियम 12 अन्वये तात्काळ प्रभावाने भारतीय प्रशासकीय सेवेतून (IAS) कार्यमुक्त केले आहे
आयएएस (प्रोबेशनरी) नियम, 1954 च्या नियम 12 मध्ये परिवीक्षाधीन सेवेत भरतीसाठी अयोग्य असल्याचे आढळून आल्याने त्याला कार्यमुक्त करण्याची तरतूद आहे.
Edited by - Priya Dixit