गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 24 नोव्हेंबर 2016 (14:08 IST)

जनधन खात्यात 15 दिवसात तब्बल 21 हजार कोटी जमा

प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात मागील 15 दिवसात तब्बल 21 हजार कोटी रुपये जमा झाल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने सरकारी अधिकार्‍याच्या हवाल्याने दिले आहे. 
 
जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यातून 'जनधन' खात्यात सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे. काही दिवसांपूर्वी जनधन खाते हे निष्क्रिय व त्यामध्ये काहीच रक्कम नसल्याने या योजनेवरच मोठी टीका करण्यात आली होती. असंघटित क्षेत्रातील लोकांना बँकिंग व्यवहाराची सवय लागावी यासाठी केंद्र सरकारने  प्रधानमंत्री जनधन योजना लागू केली होती.