मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जून 2024 (11:54 IST)

तयारी, प्रेशर आणि आत्महत्या, NEET रिजल्ट लागण्यापूर्वीच विद्यार्थिनीची आत्महत्या

कोटा मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रकरण थांबत नाही आहे. आता रिवा मधील एक विद्यार्थिनीने नवव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे. ही विद्यार्थिनी NEET परीक्षेचा रिजल्ट घेऊन तणावामध्ये होती. 
 
राजस्थानमधील कोटा मध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. बागीषा तिवारी नावाच्या या विद्यार्थिनीने इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेत आपला जीव संपवला आहे. ही विद्यार्थिनी मध्यप्रदेशमधील रिवा येथील रहिवाशी आहे. ही विद्यार्थिनी कोटा मध्ये आपला भाऊ आणि आई सोबत राहत होती. 
 
तसेच ही विद्यार्थिनी एका कोचिंगमध्ये अभ्यास करीत होती. कोटा मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रकरण खूप वाढत आहे. मागील पाच महिन्यांमध्ये 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. 
 
ही विद्यार्थिनी कोटाच्या एका कोचिंग संस्थांमध्ये नीट-युजीची तयारी करत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही विद्यार्थिनी आत्महत्या करण्यासाठी इमारतीवर गेली व तिला तिथे एका महिलेने पहिले या महिलेने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही या विद्यार्थिनीने नवव्या मजल्यावरून उडी घेत आपली जीवनयात्रा संपवली. पुढील तपास कोटा पोलीस करीत आहे.