पाकिस्तान मुर्दाबादच्या टॉलयलेटच्या टाइल्स बनवून निषेध
पुलवामा येथील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा देशभरामध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा जोरदार निषेध करत संताप व्यक्त केला आहे. यामध्ये आता गुजरात येथील टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने चक्क पाकिस्तान मुर्दाबाद च्या टॉलयलेटच्या टाइल्स बनवळ्या असून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे.
या टॉयलेटच्या टाइल्सवर पाकिस्तानचा झेंडा असून त्यावर ‘पाकिस्तान मुर्दाबाद’अशी अक्षर लिहिली आहेत. या टाइल्स सार्वजनिक शौचालय बांधण्यासाठी वापरल्या जाणार आहेत. या टाइल्स कारखान्याचे मालक सुरेश कौसुंदरा यांनी सांगितले की, आम्ही पाकिस्तानचा निषेध करण्याच्या उद्देशाने टाइल्स बनवल्या आहेत. ‘पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी या टाइल्स तयार केल्या आहेत. ज्या प्रमाणे मागणी वाढेल त्याप्रमाणे आम्ही यांचे उत्पादन वाढवणार आहोत. मोरबी येथील सर्वाजनिक शौचालय बांधण्यासाठी आगोदर त्या वापरल्या जाणार आहेत. पण जर या टाइल्सना दुसऱ्या ठिकाणांहून मागणी आलीच तर आम्ही त्या मोफतही देण्यास तयार आहोत’,असं सुरेश यांनी स्पष्ट केले आहे. टाइल्स बनवून बांधण्यात आलेले शौचालय लोक वापरतील तेव्हा पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिल्यासारखे होईल असंही या कर्मचाऱ्याने सांगितले आहे.