1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शनिवार, 13 एप्रिल 2024 (12:08 IST)

राहुल गांधी पोहचले मिठाईच्या दुकानात स्टालिनसाठी घेतली मिठाई

Rahul Gandhi reached a sweet shop
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूच्या दौऱ्यावर निघालेले राहुल गांधी हे अचानक एका मिठाईच्या दुकानात पोहचले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाहून दुकानातील कर्मचारी आश्चर्यचकित झाले. लोकसभा निवडूणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी हे लोकांमध्ये जाऊन प्रचार करीत आहे तेव्हा ते शुक्रवारी रात्री अचानक एका मिठाईच्या दुकानात गेले. व त्यांना पाहून  सर कर्मचाऱ्यांना धक्का बसला. 
 
कोयंबटूरच्या सिंगानल्‍लूर मध्ये हे मिठाईचे दुकान असून, राहुल गांधी जेव्हा रात्री आपल्या कार्यकर्त्यांसोबत निघाले तेव्हा ते तिथे दुकानात गेलेत. दुकानाच्या मालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी जेव्हा आमच्या दुकानात आलेत तर आम्हाला सर्वांना धक्का बसला आणि आनंद देखील झाला. तसेच राहुल गांधी यांना गुलाबजाम आवडले. त्यांनी एक किलो गुलाबजाम खरेदी केले.

तसेच इतर मिठाईंची चव देखील त्यांनी चाखली. व कमीत कमी तीस मिनिट ते दुकानात होते व कर्मचारी देखील खुश होते. तसेच त्यांनी मिठाई विकत घेतली व त्याचे पैसे देखील दिले. एका ग्राहकाने त्यांना मिठाई खाऊ घातली. तसेच राहुल गांधी यांनी तामिळनाडूचा प्रसिद्ध मैसूर पाक देखील खरेदी केला आणि इतर मिठाई स्टालिनसाठी देखील पॅक करून घेतली.  

Edited By- Dhanashri Naik