गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 16 नोव्हेंबर 2016 (12:15 IST)

राज्यसभेत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर आनंद शर्मा यांचे भाषण सुरु

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांच्या आरोपांनंतर केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल सरकारतर्फे देत आहेत प्रत्युत्तर
- नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या नोटबंदी निर्णयाला विरोध करण्यासाठी शिवसेना तृणमूल काँग्रेससोबत मोर्चामध्ये सहभागी होणार, शिवसेना खासदारांचा बैठकीत निर्णय, मोर्चामध्ये सहभागी होऊन राष्ट्रपतींनी निवेदन देणार, आनंदराव अडसूळ, चंद्रकांत खैरे, अरविंद सावंत, कृपाल तुमाने मोर्चामध्ये होणार सहभागी
- स्टेट बँक ऑफ इंडियाला ५०० आणि १ हजारच्या नोटा बदलणार हे तीन ते चार महिने आधीपासूनच माहित होते, मग पर्यायी व्यवस्था का नाही केली ? - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
- तुम्ही एकाचवेळी इतका पैसा काढला ? त्याचवेळी पर्यायी व्यवस्था का केली नाही - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
- सरकार प्रश्न विचारणा-याला राष्ट्रभक्तीच्या निकषामध्ये बसवले जाते, अशा प्रकारचे वातावरण या सरकारने निर्माण केले आहे - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
- तुम्ही कोणाचे ऐकत नाहीत, निर्णय घेऊन जाहीर करता आणि सर्वसामान्य माणसाला पालन करायला सांगता - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
- काळा पैसा संपत्ती, सोन्या-चांदीमध्ये आहे लोकांच्या कपाटात नाही - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.तुम्ही उद्योगपतींच्या कर्जाची पूर्नरचना केली, शेतक-यांची कर्जे माफ केली ? - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
 
आंतरराष्ट्रीय करारांमुळे परदेशी बँकांमध्ये कोणाचे किती पैसे आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही त्यांची नावे जाहीर करा - आनंद शर्मा,काँग्रेस नेता.
 
लोकांना बँकेतून पैसे काढण्यावर कुठल्या आधारावर तुम्ही निर्बंध घातले - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
 
आपला नागरी देश आहे, इथे नियम चालतात आणि तुम्ही सर्व नागरीकांना गुन्हेगार बनवलं - आनंद शर्मा.
 
गरीबाना फटका बसतोय, शेतक-यांकडे क्रेडीट कार्ड आहे ? - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
 
भारतात जाण्याआधी विचार करा, परदेशी दूतावासांनी आपल्या नागरीकांना सूचना केली - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था काळया पैशावर चालते हा संपूर्ण जगामध्ये संदेश गेला - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
 
भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्वपूर्ण योगदान आहे, या शेतक-यामुळे आपल्याला कोणासमोर हात पसरावे लागत नाही - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
 
८६ टक्के चलन ५०० आणि १ हजार रुपयांमध्ये होते, एका घोषणेने हे सर्व चलन रद्द झाले, हा सर्व काळा पैसा होता का ? - आनंद शर्मा, काँग्रेस नेते.
 
राज्यसभेत नोटा रद्द करण्याच्या निर्णयावर चर्चेला सुरुवात, काँग्रेस नेते आनंद शर्मा यांचे भाषण सुरु.
 
नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरुन राज्यसभेत गदारोळ, संसदेत चर्चेची विरोधकाची मागणी .