शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 14 सप्टेंबर 2021 (11:43 IST)

बिहारच्या खासदारांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा

बिहारच्या समस्तीपूर मतदारसंघातील LJP खासदार प्रिन्स राज पासवान यांच्या विरोधात कॅनाट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यांच्या वर तीन महिन्या आधी एका महिलेने केलेल्या तक्रारीच्या आधारे बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला आहे.चिराग पासवान यांचे चुलत भाऊ प्रिन्स यांचा विरोधात कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे.
 
दिल्लीच्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पोलिसांनी त्यांचा विरोधात 9 सेप्टेंबरला FIR दाखल केली होती.या प्रकरणी प्रिन्स यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे सांगितले जात आहे.महिलेचे वकिलांनी मे महिन्यात पोलीस तक्रार केल्याचे सांगितले आणि जुलै महिन्यात दिल्लीतील न्यायालयाने या खासदारांविरोधात FIR दाखल करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता.
 
महिलेने या खासदारांवर बलात्काराचे गंभीर आरोप लावले आहे.की खासदारांनी मला पाण्याच्या बाटलीतून काही तरी दिले ज्यामुळे मी बेशुद्ध झाले.नंतर शुद्धीवर आल्यावर खासदाराने तुला बरे वाटत नह्व्त.मी मला काय झाले असं विचारल्यावर त्यांनी मला व्हिडीओ दाखवला त्यात त्यांनी माझ्यावर बळजबरी केल्याचे व्हिडीओ बनवले होते.त्यांनी त्यात स्वतःचा चेहरा लपवून ठेवला आहे.नंतर त्यांनी मला लग्नासाठी विचारले.असं केले नाही तर मी हा व्हिडीओ व्हायरल करेन अशी धमकी दिली.
 
खासदार प्रिन्स यांनी महिलेच्या या आरोपाला फेटाळून लावले आहे.त्यांनी या संदर्भात एक ट्विट केले आहे.त्यात त्यांनी मी या महिलेने केलेल्या दावा फेटाळून लावतो असे सांगितले आहे.खासदारांनी या तक्रार विरोधात खंडणीची तक्रार दाखल केल्याचे समजले आहे.या संदर्भात त्यांनी काही पुरावे पोलिसांना दिले आहे. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी हे कट कारस्थान रचले जात आहे.असे त्यांचे म्हणणे आहे.