1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 7 जुलै 2021 (18:21 IST)

रविशंकरप्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला

ravishankar prasad
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसर्‍या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. आता रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकरही अशा मंत्र्यांमध्ये सामील झाले आहेत. दोघांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.रवीशंकर प्रसाद आयटी आणि कायदा मंत्रालय तर प्रकाश जावडेकर यांनी आयबी आणि पर्यावरण मंत्रालय सांभाळले होते. यापूर्वी डॉ हर्षवर्धन आणि रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 
राष्ट्रपती भवनातून कळविण्यात आले आहे की, 'आयटी मंत्री रविशंकर प्रसाद, पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, आरोग्यमंत्री हर्षवर्धन, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक आदींसह मंत्री मंडळाच्या 12 सदस्यांचा राजीनामा भारताच्या राष्ट्रपतींनी स्वीकारला.' सांगायचे म्हणजे की डीव्ही सदानंद गौडा, थावरचंद गेहलोत, संतोषकुमार गंगवार, बाबुल सुप्रियो, धोत्रे संजय शामराव, रतन लाल कटारिया, प्रतापचंद्र सारंगीआणि देबाश्री चौधरी यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.