सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

मोदी कपडे बदलतात तसे रिझर्व्ह बँक नियम बदलतेय: राहुल गांधी

नोटबंदीच्या निर्णयानंतर सातत्याने नवनवे नियम लागू करण्यात येत असल्याच्या मुद्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेला टीकेच लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कपडे बदलतात त्याप्रमाणे देशाची मध्यवर्ती बँक म्हणून ओळखली जाणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) दररोज नियम बदलत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. 
 
नरेंद्र मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय हा गरीबांविरोधात आहे, या आरोपाचा पुन्नरूच्चार करत 31 डिसेंबरपर्यत पाच हजार रुपयांपर्यतच जुन्या नोटा जमा करता येतील, हा नवा नियम रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
 
राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरला पाचशे व हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. यानंतर दररोज आरबीआय नवीन नियमांमध्ये बदल करत आहे. सुरूवातीला सरकारने जुन्या नोटा 31 डिसेंबरपर्यंत स्वीकारल्या जातील, असे जाहीर केले होते. आता यामध्ये बदल करून जुन्या नोटांची पाच हजारहून अधिक रक्कम एकदाच बँकेत भरता येईल. यापेक्षा अधिक रक्कम असेल तर खुलासा करावा लागेल, असा नवीन नियम आरबीआयने जाहीर केला आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे कपडे बदलतात त्याप्रमाणे आरबीआय दररोज नियमांमध्ये बदल करत आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी सोमवारी नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करत जाहीर सभेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली होती.